file photo
file photo 
विदर्भ

वाघाच्या मिशा, रानडुकराचे दात जप्त 

सकाळ वृत्तसेवा

चिमूर (चंद्रपूर) : वाघाच्या मिशा आणि रानडुकराचे दात विकण्यासाठी आलेल्या तिघांना वनविभागाने सापळा रचून अटक केली. 
बालाजी परसराम सिडाम (रा. कोलारा), राजू सुखदास पिल्लेवान (४५, रा. उसेगाव), दिलीप तुकाराम पिल्लेवान (वय ५५, रा. उसेगाव) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.                   

चिमूर तालुक्‍यालगतच ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्प आहे. या जंगल क्षेत्रात वाघांचे व तृणभक्षी प्राण्यांचेही प्रमाण वाढलेले आहे. वन्यप्राणी संरक्षण व संवर्धनाचे कठोर नियम असतानाही काही प्रमाणात शिकार होतच आहेत. ताडोबा जंगल क्षेत्रालगत असलेल्या कोलारा येथील बालाजी परसराम सिडाम याच्याकडे वाघाच्या मिशा असून ते विकण्यासाठी चिमूर येथे येणार असल्याची गुप्त माहिती वनविभागाला मिळाली. त्यानुसार वन विभागाने एक बनावट ग्राहक पाठवून मिशांचा सौदा केला. तेव्हा बालाजीकडे वाघाच्या तीन मिशा असल्याचे निदर्शनास आले. त्याला अटक करून वनविभागाच्या कार्यालयात आणण्यात आले. 

बालाजी सिडाम याची सखोल चौकशी केली असता त्यांच्या दोन सहकाऱ्यांकडे वाघाचे दात असल्याचे सांगितले. दाताचा सौदाही करण्यात आला. त्यामुळे उसेगाव येथील राजू पिल्लेवान व दिलीप पिल्लेवान हे वाघाचे दात घेऊन दुचाकी वाहनाने येताना आर्टिएम महाविद्यालयाजवळ वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना ताब्यात घेतले. वाघाच्या मिशा, डुकराचे दात कोठून आणले याची चौकशी सुरू आहे. ही कारवाई वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी भाविक चिवडे, वनपाल गायकवाड, एन. बी. उडगे, वनरक्षक राठोड, हाडवे, गायकवाड, भैसारे, मोरे यांनी केली.

(संपादन : मेघराज मेश्राम)
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jharkhand High Court: कायदेशीर प्रक्रियेशिवाय घर पाडता येणार नाही; बुलडोझर कारवाईसंदर्भात झारखंड हायकोर्टाचे महत्त्वाचे निर्देश

Cadbury chocolate: कॅडबरी चॉकलेटला लागली बुरशी? ग्राहकाने फोटो शेअर करताच कंपनीने दिलं उत्तर

No Bread Sandwich: सकाळच्या नाश्त्यात बनवा हाय प्रोटिन नो ब्रेड सँडविच, जाणून घ्या रेसिपी

Prakash Ambedkar : सुळे, पाटलांमुळे बारामतीतून माघार ; डॉ. प्रकाश आंबेडकरांनी फोडले गुपित,यंदा खाते उघडणार

Latest Marathi News Live Update : संभाजीराजेंवर कुणी दबाव टाकला याचा सामंत आज पर्दाफाश करणार

SCROLL FOR NEXT